मुंबई, 14 मे : आयपीएलमध्ये शनिवारी रात्री पंजाब किंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला असून ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्स हा यंदाच्या आय़पीएलमधून बाहेर पडणारा पहिला संघ आहे. दिल्लीने 12 सामन्यात 8 ण मिळवले आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी ते जास्ती जास्त 12 गुणच मिळवू शकतात. वॉर्नर वगळता यंदाच्या हंगामात दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही.
पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला 31 धावांनी हरवून पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंबाज किंग्जचे 12 सामन्यात 12 गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. पंजाब किंग्जच्या या विजयामुळे आरसीबी आणि केकेआरला फटका बसला. दोन्ही संघ अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर घसरले.
दिल्लीच्या होम ग्राउंडवर प्रभसिमरन, हरप्रीतचा जलवा, पंजाब किंग्सचा दणदणीत विजय
गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज 15 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यांना प्लेऑफ गाठण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांपैकी एक तरी जिंकावा लागेल. चेन्नई सुपर किंग्जचेही प्लेऑफमधील स्थान निश्चिम मानलं जात असून दोन जागांसाठी चुरस बघायला मिळणार आहे. यात मुंबई इंडियन्स सध्या तिसऱ्या स्थानी असून त्यांना उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवावा लागेल. नेट रनरेट कमी असल्याने जर तरच्या समीकरणातून वाचायचं असेल तर मुंबईला दोन्ही सामने जिंकावे लागतील.
चौथ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स असून त्यांनी 12 सामन्यात 13 गुण मिळवले आहेत. उर्वरित दोन सामने जिंकून 17 गुण मिळवू शकतात तर राजस्थान आणि पंजाब यांनाही दोन्ही सामने जिंकून प्लेऑफ गाठण्याची संधी आहे. दिल्ली कॅपिटल्सशिवाय सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्ससुद्धा प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ उर्वरित सामने जिंकून जास्तीजास्त 14 गुण मिळवू शकतात. प्लेऑफ गाठण्यासाठी तेवढे पुरेसे नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.