मुंबई, 1 एप्रिल : आयपीएल 2023 ला शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवला गेला असून या सामन्यात लखनऊने दिल्लीचा पराभव केला आहे. लखनऊने मैदान गाजवून दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला आहे.
लखनऊ सुपर जाएंट्सच्या होम ग्राउंडवर आयपीएलचा तिसरा सामना पारपडला. या सामन्यात सुरुवातीला लखनऊ जाएंट्सचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. लखनऊ जाएंट्स संघाकडून के मेयर्स आणि निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या. के मेयर्सने 38 चेंडूत 73 धावा केल्या तर निकोलस पूरनने 21 चेंडूत 36 धावा केल्या. लखनऊ सुपर जाएंट्सच्या उर्वरित फलंदाजांना मात्र वैयक्तिक 20 धावांच्या आतपर्यंतच मजल मारता आली. लखनऊ सुपर जाएंट्स संघाने 20 षटकात 6 विकेट्स गमावून 193 धावा केल्या. दिल्ली संघाच्या खलील अहमद आणि चेतन साकरीयाने लखनऊ च्या प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.
लखनऊने दिल्लीला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले होते. परंतु हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात आलेला दिल्ली संघ सुरुवातीपासूनच काही खास कामगिरी करू शकला नाही. दिल्लीचे सलामी फलंदाज पृथ्वी शॉ पाचव्या ओव्हरमध्ये मार्क वूडच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. तर पुढच्याच चेंडूवर मिचेल मार्शची विकेट पडली. दोन विकेट पडल्यावर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिल्लीची बाजू सावरण्याचा प्रयन्त केला. त्याने 48 चेंडूत 56 धावा केल्या. वॉर्नरनंतर रिली रासाऊने 30 धावा केल्या. परंतु इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. शेवटी 20 षटकात 9 विकेट्स देऊन दिल्ली संघाला केवळ 143 धावा करता आल्या. त्यामुळे लखनऊ सुपर जाएंट्स संघाचा 50 धावांनी विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.