मुंबई, 30 मार्च : जगातील सर्वात मोठ्या टी 20 क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा 31 मार्च पासून सुरु होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई आणि गुजरात यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार असून त्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा पारपडले. अशातच दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली संघाला यष्टिरक्षणासाठी दुखापतग्रस्त रिषभ पंतची रिप्लेसमेंट मिळाली आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी भारताचा युवा क्रिकेटर रिषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला होता. याअपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायांवर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. रिषभ पंत या अपघातामुळे यंदाच्या आयपीएलला देखील मुकणार आहे. तेव्हा रिषभ पंतच्या अनुपस्थितीत काही दिवसांपूर्वीच दिल्ली कॅपिटल संघाचे कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आले आहे. तसेच अक्षर पटेलच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता दिल्ली संघाला यष्टिरक्षणासाठी देखील रिषभ पंतची रिप्लेसमेंट मिळाली आहे.
IPL 2023 : गोविंदाच्या जावयाचा आयपीएलमध्ये जलवा, KKR ला जिंकवून देणार IPL ची ट्रॉफी?
रिषभ पंतच्या जागी यंदा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून बंगालचा यष्टीरक्षक अभिषेक पोरलला स्थान देण्यात येणार असल्याचे कळते आहे. ESPNcricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली संघाच्या सराव सत्रा दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे डायरेक्टर सौरव गांगुली आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी 4 युवा यष्टिरक्षकांची चाचणी घेतली. यात अभिषेक पोरलसह, लुविंथ सिसोदिया, शेल्डन जॅक्सन आणि विवेक सिंग यांचा समावेश होता. यातून बंगालच्या स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या अभिषेकची रिषभ पंतच्या जागी निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.