मुंबई, 30 एप्रिल : जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा सीजन आता रंगात येऊ लागला आहे. काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2023 चा 40 वा सामना पारपडला. या सामन्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. परंतु या सामन्या दरम्यान स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाली.
दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पारपडलाशनिवार असल्याने या सामन्याला प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थित होती. प्रेक्षक आपल्या आवडत्या टीमला चिअर करत होते. दरम्यान या सामन्यात हैद्राबादने दिल्लीचा 9 धावांनी दारुण पराभव केला. यानंतर मॅच पाहायला आलेल्या काही प्रेक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली.
A fight took place between fans in Delhi during their match against SRH. pic.twitter.com/MYPj6dqejb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.