मुंबई,ता.१६
दिवा शहराला एमआयडीसीच्या माध्यमातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याबाबत आज उद्योगमंत्री मा.ना.श्री.सुभाष देसाई यांच्यासोबत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मिळाली मंजुरी….
दिवा शहराला सद्यस्थितीत एमआयडीसीच्या माध्यमातून ३१.५० एमएलडी पाणीपुरवठा मंजूर असून प्रत्यक्षात फक्त २८ एमएलडी एवढेच पाणी प्राप्त होते. या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे हा पाणीसाठा अपुरा पडत असल्याने अतिरिक्त १० एमएलडी पाणीसाठा देण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यांची ही मागणी तातडीने मान्य करत उद्योगमंत्री मा.ना. श्री.सुभाष देसाई यांनी दिव्याला ५ एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा तातडीने वाढवून द्यायला मंजुरी दिली. याशिवाय डोंबिवलीमधील २७ गावांना कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर त्यांनी तोडगा काढायची तयारी दर्शवली.
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, माजी उप महापौर रमाकांत मढवी, दिव्यातील नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दीपक जाधव, नगरसेविका सौ.अंकिता पाटील, सौ.दीपाली भगत, सौ.सुनीता मुंडे, सौ.दर्शना म्हात्रे, विभागप्रमुख उमेश भगत, भालचंद्र भगत आणि गुरुनाथ पाटील उपस्थित होते.