चुराचंदपूर : भारतातील पूर्वोत्तर भागात असलेलं राज्य मणिपूर सध्या धगधगत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर त्यांनी मणिपूरमधील सुरक्षा वाढवली असून दिसताक्षणी समाजकंटकांना गोळ्या घालण्याचे आदेश देखील दिले आहेत.
नेमकं काय घडतंय?
राज्याच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के नागरिक हे मेईती समुदाय अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. या विरोधात चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूरच्या वतीने ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला. बुधवारी या निदर्शनात मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचार झाला. मणिपूर उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात राज्य सरकारला मेईती समुदायाच्या एसटी दर्जाच्या मागणीवर ४ आठवड्यांच्या आत केंद्राकडे शिफारस पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतरच आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला
मणिपुर तनाव: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने आज मणिपुर के मुख्यमंत्री एन बीरेन सिंह, केंद्रीय गृह सचिव, निदेशक आईबी और राज्य के साथ-साथ केंद्र के संबंधित अधिकारियों के साथ दो वीडियो-कॉन्फ्रेंसिंग बैठकें कीं। उन्होंने मणिपुर के पड़ोसी राज्यों के मुख्यमंत्रियों से भी बात की।… https://t.co/H7Q3ZatBcH
— ANI_HindiNews (@AHindinews) May 4, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.