मुंबई : के एल राहुलला सामन्या दरम्यान दुखापत झाली आहे. लखनऊचा कर्णधार के एल राहुल पुढचा सामना खेळणार नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या दुखापतीवर बराच सस्पेन्स निर्माण करण्यात आला आहे. तो आयपीएलमधून बाहेर पडणार की उर्वरित सामने खेळणार की आणखी काही निर्णय घेतला जाणार याबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
आयपीएल 2023 चा 45 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. चेन्नई आणि लखनऊ दोन्ही संघ एकमेकांना कडवी टक्कर देणारे आहेत. हा सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर होणार आहे.
IPL 2023 : महिला अडखळून पडली, तरी फोटो काढण्यात बिझी होता स्टार क्रिकेटर, सोशल मीडियावर झाला ट्रोल
के एल राहुलच्या दुखापतीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. केएल राहुल जखमी झाला आहे. त्यामुळेच तो चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार नसल्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप संघाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कदाचित दुखापतीमुळे के एल राहुल आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तो काही दिवस आराम करून मगच मैदानात परतेल. मात्र अजून BCCI ने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.
राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्याकडे संघाचं नेतृत्व असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू क्विंटन डी कॉकला के एल राहुलच्या जागी टीममध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. डी कॉकने या मोसमात आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. गेल्या मोसमात त्याने 508 धावा केल्या होत्या. डी कॉकने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली होती.
IPL 2023 : मोहित शर्माने पकडला शार्दूल ठाकूरचा अवघड कॅच, Video Viral
संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, आवेश खान, अमित मिश्रा
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तिक्षाणा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.