पुणे, 27 एप्रिल : अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रोज एक अपघाताची बातमी समोर येत असते. रस्त्यांवर भरधाव चालणाऱ्या गाड्यांमुळे अनेक भीषण अपघात घडत असतात. या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर येतात. अशातच आणखी एका भयान अपघाताची घटना समोर आलीये.
जेवण झाल्यानंतर रात्री शतपावली करण्यासाठी निघालेल्या एका महिलेला दुचाकी स्वराने धडक दिली. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रात्रीच्या वेळीचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या शहरातून (पुणे)
जेवण झाल्यानंतर रात्री शतपावली करण्यासाठी निघालेल्या एका महिलेला दुचाकी स्वराने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून यात पादचारी महिलेस दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिल्याचे स्पष्ट दिसते. जेल रोडच्या पाण्याच्या टाकी कडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मोटरसायकल चालकाने महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेने तिच्या डोक्याला व छातीला जोरदार मार लागला आणि महिलेला उपचारासाठी नाशिक रोड येथील रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
दुचाकीच्या धडकेने पादचारी महिला ठार, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर#accident #viral #shocking #scary #news18lokmat pic.twitter.com/14A7y7JJMW
— News18Lokmat (@News18lokmat) April 27, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.