अरुणकुमार शर्मा (मुंगेर), 29 एप्रिल : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंगेर जिल्ह्यातील चंद्रपुरा गावाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रपुरा गावाजवळील NH-80 वर या मार्गावर ही घटना घडली. गुन्हेगारांनी गोळ्या झाडून पळून गेल्याने मारेकऱ्यांचा शोध लागू शकला नाही.
LIC एजंट आशिष राज आणि त्याची परिचारिका पत्नी सुनीता कुमारी असे मृताचे नाव आहे. आशिष राज हे आपल्या पत्नीला बरयारपूर येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात ड्युटीवर सोडण्यासाठी जात होते. यावेळी मारेकऱ्यांनी डाव साधत त्यांची हत्या केली. सध्या घटनास्थळी पोहोचून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर दोषींचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.
धक्कादायक! पुण्यात सहावीतली विद्यार्थीनी गरोदर, पोटात दुखतंय म्हणून गेली होती दवाखान्यात
मुंगेर जिल्ह्यातील सत्झाजुरिया गावातील रहिवासी एलआयसी एजंट आशिष राज हा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पत्नी सुनीता कुमारीला बरयारपूर ड्युटीवर सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, चंद्रपुराजवळ NH-80 मार्गावर जाणाऱ्या गुन्हेगारांनी अचानक गोळीबार केला. गुन्हेगारही दुचाकीस्वार असल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी आशिष राज यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी डीएसपी राजेश कुमार यांनी पाहणी करत तपास केला. मात्र, हत्येचे कारण समजू शकले नाही.
डीएसपी राजेश कुमार म्हणाले की, गुन्हेगारांनी या दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या का केली याबाबत अद्यापही कारण समजू शकले नाही. घटनास्थळी तपासादरम्यान पोलिसांनी काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. या खून प्रकरणाबाबत पोलिसांना तपासादरम्यान महत्वाचे धागेदोरे सापडल्याची माहिती आहे.
त्याआधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमलाही तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. लवकरच या हत्याकांडात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात येईल. हत्येमागील कारणांचाही पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.