नवी दिल्ली 28 मार्च : मूल जेव्हा या जगात येतं तेव्हा त्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची असते. वडील त्याला संरक्षण देतात, तर आई पोट भरण्यापासून त्याची प्रत्येक गरज पूर्ण करते. मात्र, अनेकवेळा अशा घटना समोर येतात, ज्या ऐकून माणसाचा माणुसकीवरचा विश्वास उडतो. अशीच एक घटना रशियात घडली, जिथे पालकांनी स्वतःच्या बाळाला उपाशी ठेवत त्याचा जीव घेतला.
अखेर 20 वर्षानंतर उलगडलं एलियनच्या सांगाड्याचं रहस्य, नक्की हा प्रकार काय?
मिररच्या वृत्तानुसार, एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे कारण तिने आपल्या मुलाला खाणं-पिणं देणं बंद केलं आणि त्याचा उपासमारीने मृत्यू झाला. ओक्साना मिरानोवा असं या महिलेचं नाव असून ती 33 वर्षांची आहे. ही घटना ऐकून तुमचं हृदय हेलावून जाईल. कारण नवजात बाळासोबत कोणी असं कसं करू शकतं? याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
ओक्साना मिरानोव्हाने एका मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव तिने कॉसमॉस ठेवलं. तिचा जोडीदार आणि मुलाचे वडील मॅक्सिम (वय 43) एक लाइफस्टाइल कोच आहे. वडिलांना आपल्या बाळाला प्राणा ईटिंग म्हणजे एक प्रकारच्या डायटवर ठेवायचं होतं . या डायटमध्ये लोकांना दीर्घकाळ अन्न आणि पाण्याशिवाय जगावं लागतं आणि ते फक्त सूर्यप्रकाशावर जगतात. त्याने आपल्या दोन महिन्यांच्या बाळासाठीही हाच डायट ठरवला.
या वेड्यावाकड्या प्रयोगातून त्याला या डायटबद्दल जगाला सांगायचं होतं, असं मुलाच्या आजीने सांगितलं. त्याने मुलाच्या आईला बाळाला दूध देण्यास नकार दिला. कारण त्याला फक्त सूर्यप्रकाश खाऊन जगणारं बाळ तयार करायचं होतं. मुलाची आई ओक्साना आणि वडील मॅक्सिम या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आई म्हणते की, तिला तिच्या जोडीदाराची भीती वाटत होती, म्हणूनच तिने गुपचूप मुलाला अनेक वेळा बेबी फूड दिलं. मुलाचा जन्मही घरी झाला. मुलाच्या आजीने पोलिसांना यासंबंधी सर्व काही सांगितलं आणि असंही सांगितलं की मॅक्सिम त्याच्या मुलीला गुलामाप्रमाणे ठेवत असे. त्यामुळेच त्याने हा विक्षिप्त प्रयोग मुलावरही केला. मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला डॉक्टरांकडे न्यायचं होतं, मात्र वाटेतच मुलाचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.