नवी दिल्ली: एकेकाळी हरियाणाच्या कर्नालमध्ये नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्युटच्या कॅम्पसमध्ये दूध विकून तीन रुपये कमवणाऱ्याने 22 वर्षांनी एका डेअरीची सुरुवात केली. या व्यक्तीचं नाव नारायण मुझुमदार असून, ते दूध गोळा करायला हावडा परिसरामध्ये सायकलने फिरायचे. ते रेड काऊ डेअरीचे मालक आहेत. कंपनी दुधाशिवाय दही, तूप, पनीर, रसगुल्ले व इतर दुधाची उत्पादनं विकते.
नारायण मुझुमदार यांचा जन्म 25 जुलै 1958 ला पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात झाला. तीन भावंडांत ते दुसरे होते. त्यांचे वडील बिमलेंदु मुझुमदार शेतकरी होते. त्यांचं शालेय शिक्षण स्थानिक शाळेत झालं. 1975 मध्ये कर्नालच्या एनडीआरआयमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये ते बीएससी करायला गेले.
तेव्हा 250 रुपये फी होती. तेवढे पैसे नसल्याने त्यांनी पहिल्या वर्षी दोन महिने पार्ट टाइम काम केलं. ते सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत दूध विकायचे, बदल्यात त्यांना तीन रुपये मिळायचे. नंतर त्यांना पश्चिम बंगाल सरकारकडून 100 रुपये स्कॉलरशिप मिळू लागली व वडील घरून 100 रुपये पाठवायचे. 1979 मध्ये त्यांनी डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यासाठी कुटुंबाने एक एकर शेत विकलं होतं.
मामाच्या पावलावर भाच्याचं पाऊल, आज 5 एकरमधून करतोय जबरदस्त कमाई
डिग्री घेतल्यावर नारायण कोलकात्यामध्ये क्वालिटी आईसक्रीम कंपनीमध्ये डेअरी केमिस्ट म्हणून रुजू झाले. त्यांना 612 रुपये पगार मिळायचा. ते पहाटे 5 ची ट्रेन पकडून कामावर जायचे. घरी यायला रात्रीचे 11 वाजायचे, त्यांचे वडील त्यांना स्टेशनवर घ्यायला यायचे. पण तीन महिने नोकरी करून त्यांना कंटाळा आला. मग त्यांनी सिलीगुडीमध्ये हिमालयन को-ऑपरेटिव्हमध्ये नोकरी मिळवली.
इथे ते डॉ. जगजित पुंजार्थना भेटले. ते मदर डेअरीमध्ये जनरल मॅनेजर होते. त्यांनी नारायण मुझुमदार यांना कोलकात्यामध्ये मदर डेअरीत काम करण्याची ऑफर दिली. 1981मध्ये ते रुजू झाले व 1985मध्ये तिथून बहरिनमध्ये डॅनिश डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये काम करू लागले. तिथून तीन महिन्यांत ते पुन्हा कोलकात्याला परतले व मदर डेअरीत रुजू झाले.
नोकरी-धंद्याचं बस्तान बसेल अगदी सेट; गाईची अशी प्रतिमा लावण्याचा होतो फायदा
1995 मध्ये ते ठाकेर डेअरी प्रॉडक्टमध्ये कन्सल्टंट जनरल मॅनेजर झाले. मग ते या कंपनीसाठी शेतकऱ्यांकडून दूध घेऊ लागले. पण तिथले मर्चंट शेतकऱ्यांची फसवणूक करायचे. 7- 8 रुपये लिटर भाव मिळणाऱ्या शेतकऱ्यांना मुझुमदार 10-12 रुपये प्रति लिटर भाव देऊ लागले.
यामुळे परिसरात त्यांचं नाव झालं. मुझुमदार यांच्या कामामुळे खूश झालेल्या ठाकेर यांनी 1997मध्ये एक चिलिंग प्लाँट सुरू केला. तीन महिन्यांत फायदा झाला, मग त्यांनी प्लाँट वाढवले. 2000 साली त्यांनी ठाकेरांकडून चिलिंग युनिट विकत घेतलं. त्याच वर्षी त्यांनी प्रोप्रायटरशिप फर्मला पार्टनरशिप कॉर्पोरेशनमध्ये बदललं. पार्टनर म्हणून पत्नीला घेतलं. 2003मध्ये ठाकेर डेअरी सोडून मुझुमदार यांनी स्वतःची रेड काऊ डेअरीची सुरुवात केली.
कंपनीची कोट्यवधींची उलाढाल
स्पर्धा वाढल्यावर मुझुमदार यांनी 2007 मध्ये कोलकाता डेअरीशी करार केला. या सोबतच रेड काऊ पॉली पाउच लाँच केलं. नारायण यांचा मुलगा नंदनही त्याच वर्षी व्यवसायात रुजू झाला. रेड काऊ डेअरीच्या आता तीन फॅक्टरी असून एक हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. बंगालमधील 12 जिल्ह्यांमध्ये 3 लाखांहून अधिक शेतकरी या फर्मशी जोडलेले आहेत. कंपनीची उलाढाल 800 कोटी रुपयांहून अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.