मुंबई, 1 मे : महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीकोणातून तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे टूर पॅकेज सुरू करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची आखणी केली आहे. मात्र. या संकल्पनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.
ही कोणत्या राज्याची जाहिरात?
महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवरून पोस्ट केल्यानंतर त्यावरील ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे वाक्य पाहून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला शासनाच्या जाहिरातीमध्ये अशी भाषा वापरली जाते. या सरकारला मराठी भाषेबद्दल काहीच वाटत नसल्याचे हे चिन्ह आहे. पाहा आपला महाराष्ट्र म्हणा. देखो म्हणजे? ही कोणत्या राज्याची जाहिरात आहे? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय म्हणाले अजित पवार?
‘मुंबईचं मराठीपण टिकवण्यासाठी कुणी काम केलं असेल तर ते हिंदुह्रदयसम्राट बाळाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. हेच काही लोकांना पटत नाही. त्यामुळे त्यांनी फोडायचं राजकारण सुरू केलं. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान योग्य राहणार का, कायदा राहणार का, घटना राहणार का, याचा विचार केला पाहिजे’, असं अजित पवार म्हणाले.
वाचा – अजितदादा इज बॅक, बाळासाहेबांचं स्मरण करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा!
पोटनिवडणुका असेल किंवा बाजार समिती निवडणुकीत आपण चांगलं यश मिळवलं असून जनता आपल्यासोबत आहे. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. कोरोनाच्या संकटात आपण चांगलं काम केलं. आर्थिक शिस्त आम्ही कुठेही मोडली नाही. 31 मार्च 1 हजार कोटींची बिलं या सरकारने देण्याची थांबवली आहे. कंत्राटदारांना यांनी थांबवलं, कोण याला जबाबदार आहे? असा सवाल अजित पवारांनी विचारला.
माझा शेतकरी तिथे अडचणीत आहे, पण त्यांना मदत करण्याची सरकारीच भूमिका नाही. शिंदे फडणवीस काय करत आहेत? त्यांचं काम नाही का? शेतकऱ्यांची पिक उद्धवस्त झाली आहेत, परंतु, त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारची नाही. फडणवीस शिंदे काय करत आहेत, त्यांचं हे काम नाही का? पण यांना बाकीच्या कामांमध्ये रस आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.