चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 15 मे : मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व भूकंप घडला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदारांसह महाविकासआघाडीमधून बाहेर पडले. राज्यामध्ये हे सत्तानाट्य सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, पण अखेरच्या क्षणी डाव फिरला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यामुळे याआधीच भाजप नेत्यांनी खंत व्यक्त केली आहे, यात आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळिक आंनी फडणवीस यांच्यासमोरच त्यांच्या मनातील सल व्यक्त केली आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
‘राज्यात सत्तांतर झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर बसू शकले नाहीत, याची सल कायम मनात राहिल. साहेब, आमची इच्छा पूर्ण करा. अकेला देवेंद्र क्या करेगा, तो अकेला देवेंद्र सबकुछ करेगा,’ असं जगदीश मुळिक म्हणाले आहेत.
महापालिका निवडणुकांची लढाई कधी होणार? फडणवीस बोलून गेले!
जगदीश मुळिक यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही सत्तांतरावेळी काय घडलं यावर भाष्य केलं आहे. खरंतर या लढाईमध्ये मी घरीही बसायला तयार होतो, पण आपल्या पक्षश्रेष्ठींनी मला सन्मानाने उपमुख्यमंत्रिपदावर बसवलं, हे आपलं सरकार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
याआधी चंद्रकांत पाटील यांनीही प्रदेशाध्यक्ष असताना मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं विधान केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे, असं वक्तव्य केलं. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही फडणवीस मनातले मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं होतं.
महाविकासआघाडी ऍक्टिव का? कर्नाटक निकाल नाही तर… अजितदादांना वेगळीच शंका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.