राष्ट्रीय, 2 मे 2023 : गेल्या आठवड्याच्या अखेरीस टाटा आयपीएल टी-20 क्रिकेट सामन्यांचा थरार उच्चीला पोहोचला आणि तोच अनुभवण्यासाठी टाटा इंडियन प्रीमिअर लीगचा डिजिटल राइट्स होल्डर असलेल्या जिओ सिनेमाने क्रिकेट चाहत्यांना बडोदा, कूरनूल, वर्धमान, जळगाव, वाराणसी कर्नाल आणि थूतुकुडीया ठिकाणी उभारलेल्या टाटा आयपीएल फॅन पार्कमध्ये आमंत्रित केलं होतं. देशात सात ठिकाणी असलेल्या टाटा आयपीएल फॅन पार्कमध्ये जिओ सिनेमाच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आठवड्याच्या शेवटी असलेल्या चार मॅचेस पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
इंटरनेट वापरत असलेली प्रत्येक व्यक्ती आणि समाजातील प्रत्येक घटकाला लाईव्ह स्ट्रिमिंगच्या मदतीने क्रिकेट सामने पाहता यावेत म्हणून 35 शहरं आणि लहान गावांमध्ये जिओ सिनेमाने फॅन पार्क्स उभारली आहेत. आपल्या डिजिटल फर्स्ट ऑफरिंगच्या माध्यमातून घरातून बाहेर पडून प्रेक्षकांना स्ट्रिमिंगचा आनंद लुटता यावा म्हणून जिओ सिनेमा 13 राज्यांत सोय उपलब्ध करून देत आहे आणि डिजिटलमध्ये हे पहिल्यांदाच घडतंय. 16 एप्रिलनंतरच्या तीन आठवड्यांमध्ये आतापर्यंत ही सुविधा 15 शहरांत उपलब्ध करून दिली गेली आहे. समाजाने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन मॅच पाहण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात डिजिटल स्ट्रिमिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. यामुळे देशाच्या ज्या भागांत अजूनही लिनियर म्हणजे केबलच्या माध्यमातून पेड चॅनलवर मॅच पाहणं तितकसं परवडणारं नाही अशा ठिकाणि लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्यात या फॅन पार्कच्या इव्हेंटला जबरदस्त यश आलंय.
बडोदा, कुरनूल आणि वर्धमान इथल्या प्रेक्षकांनी शनिवारी गतविजेत्या गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर सात विकेट राखून केलेली मात स्ट्रिमिंगच्या माध्यमातून अनुभवली तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा नऊ रन्सनी कसा पराभव केला याचा थरार अनुभवला.
जळगाव, वाराणसी, करनाल आणि थूतुकुडीमधल्या प्रेक्षकांनी चार वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर पंजाब किंग्जने चार विकेट राखून कसा दणदणीत विजय मिळवला हे रविवारी दुपारी स्ट्रिमिंगद्वारे पाहिलं. तर संध्याकाळी त्यांनी टाटा आयपीएलमधल्या एक हजाराव्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्सने कसा धुव्वा उडवला हे लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून अनुभवलं. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये आयपीएलमधील सर्वाधिक स्कोअर पार करून मुंबईने विजय मिळवला तेही त्यांनी अनुभवलं.
वानखेडे स्टेडियम बाहेरच विकली पाणीपुरी, आतून पाहण्याचं होतं स्वप्न, तिथेच झळकावलं शतक
प्रेक्षकांना टाटा आयपीएल फॅन पार्कमध्ये आमंत्रित करून जिओ सिनेमा क्रिकेट प्रत्येक इंटरनेट युजरपर्यंत आणि समूहापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा आयपीएल फॅन पार्क सुविधा पूर्णपणे मोफत आहे. इथं सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी सुविधा आहेत फॅमिली झोन, किड्स झोन, फूड अँड बेव्हरेजेस आणि जिओ सिनेमा एक्सपिरिअन्स झोन या सुविधा प्रेक्षक एंजॉय करत आहेत.
टाटा आयपीएल फॅन पार्क्सच्या माध्यमातून या सात शहरांतील क्रीडारसिकांना जबरदस्त अनुभव घेता आला आहे. त्यांना आपले कुटुंबीय आणि मित्रमंडळीबरोबर क्रिकेटचा आनंद लुटता आला आहे.
जिओ सिनेमावरील टाटा आयपीएलची व्ह्युवरशिप पाहता प्रेक्षक आता लाईव्ह स्पोर्ट्स पाहण्यासाठी डिजिटलला प्राधान्य देत असल्याचं सिद्ध होतंय. यामुळे जगभरातच स्ट्रिमिंग पाहण्यासाठी समाज एकत्र येत असल्याचं चित्रं आहे.
प्रेक्षक (iOS & Android) फोनवर जिओ सिनेमा डाउनलोड करून त्यांच्या आवडीच्या खेळाचा आनंद लुटू शकतात. अपडेट्स, बातम्या, स्कोअर्स, व्हिडिओ यासाठी प्रेक्षक फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युबवर Sports18 ला फॉलो करू शकतात. तर फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर जिओ सिनेमाचा आनंद लुटू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.