नाशिक, 23 एप्रिल : नाशिक जिल्ह्यात उष्माघाताने एका अग्निवीराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अग्निवीर भरती अंतर्गत प्रशिक्षण घेत असताना हर्षल ठाकरे याला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्याची प्राणज्योत मालवली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हर्षल ठाकरे हा मूळचा धुळे जिल्ह्यातला होता. २१ वर्षांचा हर्षल अग्निवीर अंतर्गत लष्करात दाखल झाला होता. नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये त्याचं प्रशिक्षण सुरू होतं. १ जानेवारी रोजी तो अग्निवीर म्हणून रुजू झाला होता.
सासरवाडीतच मविआचा अजित पवारांना धक्का; पोस्टरवरून फोटो गायब, पुन्हा चर्चेला उधाण!
तुमच्या शहरातून (नाशिक)
प्रशिक्षण सुरू असतानाच हर्षलला उलट्या आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर हर्षलला आर्टिलरी रुग्णालयात दाखल केलं. लान्स नायक नरेंद्र सिंग यांनी त्याला रुग्णालयात नेलं पण तिथे त्याचा मृत्यू झाला. आर्टिलरी सेंटरकडून याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे.
हर्षल ठाकरेच्या मृत्यू प्रकरणी अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षलला उष्माघाताचा त्रास कसा झाला? याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.