मुंबई, 19 मे: आज दिनांक १९ मे २०२३. शुक्रवार. आज वैशाख अमावस्या. भावूका अमावस्या. आज श्री शनैश्वर जयंती असून आपण सर्वांवर शनी देवांची कृपा दृष्टी राहो ही सदिच्छा . शनि जप व दान अवश्य करावे. चंद्र आज मेष राशीत असून पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
अचानक आयुष्यात होणाऱ्या घटना विचलित करतील. आज राशीत होणाऱ्या पंचग्रही योगामुळे व्यवसाय,नोकरीत जास्त ताण पडेल.मानसिक घालमेल होईल. जबाबदारी राहील. घरामध्ये वेळ जाईल. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.
वृषभ
आज दिवस काळजी घेण्याचा आहे हे ध्यानात ठेवा. दशमात शनि आहे.व्यय स्थानात ग्रह प्रवासाचे योग आणतील. प्रकृती जपा. कार्यालयीन कामा निमित्त प्रवास , नातेवाईक भेट संभवते. आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम.
मिथुन
काहीसा निराश स्वभाव झाला असला तरी चंद्र आर्थिक पाठबळ देईल. त्रासदायक वातावरण आहे. मंगळ लहान सहान दुखणी देईल.. कोणालाही उधार देणे टाळा. वाद कलह टाळा . व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.
Rose Quartz Stone Benefits In Marathi: गुलाबी क्रिस्टल आहे प्रेमाच प्रतीक
कर्क
दशमात गुरू राहू सूर्य योग आहे. राशी स्वामी चंद्र मंगळसोबत प्रतियोग करीत आहे. संततिविषयी ताण अनुभव कराल. वैवाहिक जीवन कष्ट दायक आहे.. गुरूचे पाठबळ व रवि चांगले फळ देईल . प्रकृती जपून काम करा..दिवस मध्यम.
सिंह
राशीच्या भाग्य स्थानात चंद्र आणि व्यय मंगळ आर्थिक बाजू जपा असे सांगत आहे. प्रकृतीची काळजी घ्या.महत्वाचे निर्णय टाळा. गुरू भाग्यात उत्तम साथ देईल.दिवस मध्यम.
कन्या
सामाजिक आणि गृह क्षेत्रात काही कटकटी निर्माण होतील. संतती चिंता मिळेल. चंद्र माहेरचे नातेवाईक भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न कमी होतील. दिवस मध्यम.
तुला
शुक्र भाग्यात नोकरी मध्ये संधी देईल..अध्यात्मिक बाबीत खर्च भरपूर होईल .सुखसोयी मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस चांगला.
वृश्चिक
भाग्यातील मंगळ वृश्चिक व्यक्ती ना प्रवास घडवेल. प्रकृती जपण्याचे संकेत देत आहे . प्रयत्न पूर्वक जागरूक रहा. वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. चंद्र शष्ठ आहे. प्रवास , गृह सौख्य , आर्थिक, धर्म कारण यासाठी उत्तम फळ देईल .
Amethyst Crystal हीलिंग क्रिस्टल म्हणून ओळखले जाते
धनू
शैक्षणिक अर्हता कुठल्याही बिकट परिस्थिती तून मार्ग दाखवते याचा प्रत्यय येईल. पंचम गुरू व चंद्र उत्तम सामाजिक दर्जा देईल. जवळपासचे प्रवास योग येतील. प्रकृती ठीक राहील. संतती चिंता होईल. दिवस मध्यम.
मकर
चतुर्थ स्थानातील चंद्र आणि सप्तम मंगळ यांच्या उपस्थिती मुळे व्यवसाय वृद्धी,प्रवास योग बनत आहे. . वैवाहिक जीवन आनंदी राहील. कला प्रकारात रुची निर्माण करेल. प्रवास योग येतील . संतती आणि जोडीदारासोबत आनंदाने दिवस घालवाल.
कुंभ
शनी राशीमध्ये भ्रमण करीत आहे. कुंभ व्यक्ती आज निराश असतील. आज चंद्र शत्रू निर्माण करेल . प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . मुलांचे प्रश्न त्रास दायक होतील . संतती ,व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.
मीन
राशी स्वामी गुरु सध्या राहू सोबत असून मनस्थिती द्विधा राहील. गुरूच्या धन स्थानातील उपस्थिती मुळे आर्थिक लाभ आणि कौटुंबिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. कार्यालयीन जीवनात सुधारणा होईल. अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस मध्यम..
शुभ भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.