मुंबई, 20 मे: आज दिनांक २० मे २०२३.. शनिवार. आज ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा. गंगादशहरा प्रारंभ. चंद्र आज वृषभ राशीत भ्रमण करेल.. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
आज दिवस आनंदात घालवा .राशीतील गुरू रवि प्रसिद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व देतील. घरामध्ये सत्संग घडेल. जास्तीची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.
वृषभ
व्यय राहू गुरू रवि तणावपूर्ण वातावरण ठेवेल. काहीआनंदाचे प्रसंग देखील येतील .खुश रहा. कार्यालयीन कामा निमित्त प्रवास ,नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील. जोडीदार आनंदी असेल. दिवस सुखद.
मिथुन
आनंदी स्वभाव असला तरी व्यय चंद्र आहे. काही कारणाने तणावात टाकणारे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कोणालाही जमीन राहणे टाळा. कार्य करताना विचार करा. प्रवासात जपून रहा. व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.
कर्क
दशम गुरू शुभ आणि चंद्र लाभ स्थानात आर्थिक भरभराट करेल. ताण कमी करेल.. वैवाहिक जीवन त्रासदायक आहे.. शनि आर्थिक दृष्ट्या कष्ट देईल . प्रकृती जपून काम करा..दिवस उत्तम.
सिंह
आर्थिक दृष्ट्या दिवस शुभ आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. आर्थिक दृष्ट्या दिवस उत्तम.
कन्या
समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र नातेवाईक भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्या संबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.
विवाहित पुरुषांना का आवडते दुसऱ्याची बायको? चाणक्य नीतीनुसार ही आहेत कारणे
तुला
शुक्र घरामध्ये बदल घडवून आणेल. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. जोडीदाराच्या आयुष्यात अनेक बदल होतील. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.
वृश्चिक
मंगळ कर्क राशीत वृश्चिक व्यक्तींना प्रवास योग आणेल. प्रयत्न पूर्वक शांत रहा. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. सप्तम चंद्र गृह सौख्य , नोकरी यासाठी उत्तम फळ देईल .
धनदेवता कुबेराला प्रसन्न करायचे असेल तर घराच्या या दिशेला लावा हे रोप
धनू
गुरुकृपा आहे. कुठल्याही संकटातून मार्ग काढाल पंचम गुरू व षष्ठ चंद्र योग घरासंबंधी घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . लिखाण मध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील .व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.
मकर
राशीच्या पंचम स्थानात चंद्र नवीन संधी प्राप्त करून देईल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा.घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस शुभ.
कुंभ
राशीतील शनी आणि चतुर्थ चंद्र नोकरी व्यवसायात जपून असा असे संकेत देत आहे.पंचम शुक्र संततीला अतिशय शुभ असून सामाजिक प्रतिष्ठा देईल. दिवस उत्तम.
मीन
राशी स्वामी शुभ आहे.रवि बुध गुरू उपस्थिती मुळे सामाजिक,आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील.प्रवास,बंधुभेट संभवते. दिवस मध्यम.
शुभ भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.