अहमदाबाद, 10 एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्सचे प्रमुख प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी रिंकू सिंहवर कौतुकाचा वर्षाव केला. अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहने अखेरच्या षटकात सलग पाच षटकार मारत केकेआरला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालच्या गोलंदाजीवर त्याने तुफान फटकेबाजी केली. रिंकू सिंहच्या या खेळीवर संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पडिंत यांनी ड्रेसिंग रूममध्ये केलेल्या कौतुकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडू बसलेले दिसतात. यावेळी प्रशिक्षक चंद्रकांत पडिंत यांनी म्हटलं की, “मी ४३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत दोनच खेळी अशा पाहिल्या. त्यात एक रवी शास्त्रींनी एका षटकात मारलेले सहा षटकार आणि दुसरी जावेद मियादादने शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार. आता तिसरी खेळी रिंकू सिंहची आहे.” ड्रेसिंग रूममध्ये रिंकू सिंहच्या एक षटकात पाच षटकार मारून सामना जिंकून देण्याच्या कामगिरीबद्दल एक पुरस्कारही दिला गेला.
IPL 2023 : ‘हट रे’, कॅमेरामनवर भडकली काव्या मारन; VIDEO VIRAL
How a winning dressing room sounds like! 💜😍#GTvKKR | #AmiKKR | #TATAIPL 2023 pic.twitter.com/hTOJidtTnR
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.