कोलकाता, 21 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सने सलग पाच पराभवानंतर आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केकेआरविरुद्ध विजय मिळवला. केकेआरला ४ विकेट राखून पराफभूत केलं. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने दोन वर्षानंतर इशांत शर्माला संधी दिली. या सामन्यात त्याने मैदानात उतरताच कमाल केली. त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.
इशांत शर्माने अखेरचा आयपीएल सामना २०२१ मध्ये खेळला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने २०२१ मध्ये तीन सामने खेळले होते. गेल्या हंगामात त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे इशांत शर्मा नाराज होता. आयपीएल २०२३ मध्ये दिल्लीने सुरुवातीच्या पाच सामन्यात त्याला संधी दिली नाही.
IPL Top Moments: नो बॉलने KKRचा केला घात, रसेलच्या मसल पॉवरवर वॉर्नरची खेळी पडली भारी
सलग पाच सामने गमावल्यानतंर दिल्लीने इशांत शर्माला संघात घेतलं. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत इशांत शर्माने सहाव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर केकेआरचा कर्णधार नितीश राणाला बाद केलं. तो फक्त चार धावा करू शकला. त्यानंतर सुनिल नरेनला इशांतने बाद केलं.
इशांत शर्माने संघासाठी दोन मोठ्या विकेट घेतल्या. याशिवाय त्याने कमी धावाही दिल्या. चार षटकात फक्त १९ धावा देत त्यानं २ विकेट घेतल्या. पुनरागमन करताना इशांत शर्माने जबरदस्त कामगिरी केली.
२०२१ मध्ये इशांत शर्माने तीन सामन्यात एकूण १२ षटके टाकली होती आणि यात त्याला एकच विकेट घेता आली होती. २०२० मध्ये त्याने तीन षटके गोलंदाजी करताना एकही विकेट घेतली नव्हती. दोन वर्षात फक्त १५ षटके गोलंदाजी करताना त्याला एकच विकेट घेतला आली होती. मात्र यंदाच्या हंगामात चार षटके टाकत दोन विकेट घेतल्या.
दिल्लीने या सामन्यात कोलकाताच्या दिग्गज फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. केकेआरला २० षटकात १२७ धावाच करता आल्या. दिल्लीकडून जेसन रॉय ४३ धावा तर आंद्रे रसेल ३८ धावा करू शकला. तर हे आव्हान केकेआरने ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.