गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड, 7 मे : अनेक वाद विवादात ‘द केरला स्टोरी’ अखेर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे लोक चित्रपटाचं समर्थन करत आहेत तर दुसरीकडे त्यावर टीका करत आहेत. ‘द केरला स्टोरी’ वरून सगळीकडे वातावरण तापलेलं आहे. या चित्रपटावरुन पिंपरी चिंचवड जवळील आळंदीतील एका रिक्षा चालकाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल झाली असून संबंधित रिक्षा चालकाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
काय आहे प्रकरण?
साधू मगर असं या रिक्षा चालकाच नावं असून द केरला स्टोरी हा चित्रपट बघण्यासाठी जाणाऱ्या महिलांसाठी आपल्या रिक्षातून मोफत प्रवासाची सुविधा सुरू केली होती. आपल्या या उपक्रमाबद्दलची पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकली होती. ती पोस्ट बघून साधूला आधी कमेंटमध्ये धमकी दिल्या जात होत्या. नंतर आपल्याला फोनवरही जीवे मारण्याच्या धकम्या दिल्या गेल्याची तक्रार साधूने पोलिसांकडे केली. त्यानुसार त्याला संरक्षण देणयात आलं आहे.
दरम्यान हा प्रकार कळताच भाजपचे विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांनी साधूच्या घरी जाऊन भेट घेतली. राज्याचं सरकार आणि पोलीस यंत्रणा त्याच्याबरोबर असल्याचं सांगत साधूच्या उपक्रमाला विरोध करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय चळवळीचा हात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण आल्याचंही दिसतं आहे.
वाचा – मृतदेहाचे 9 तुकडे अन् मानवी कवटी ‘त्या’ अंगणवाडी सेविकेची? पोलीस गुंतले तपासात
ट्रेलरमध्ये केलेले बदल
ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत होता. यानंतर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत संताप आणि निदर्शने सुरू झाली आहेत. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर नुकताच ‘32000 महिलांच्या कथेवरून तीन महिलांच्या कथेत बदलला आहे. यावरून वाद नव्याने सुरू झाला आहे.
वादानंतरही बंपर कमाई
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या रिलीजचा आज तिसरा दिवस आहे. मात्र, चित्रपटावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता अनेक कलाकारही पुढे येऊन या चित्रपटाविषयी आपलं मत मांडू लागले आहेत. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. इतक्या वादांत अडकूनही चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. नुकतेच या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.