मुंबई, 9 मे : द केरळ स्टोरी चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता या वादात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या चित्रपटामुळे केरळची प्रतिमा डागळली गेली सोबतच राज्यातील महिलांचा अपमान झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड एका वृत्तवाहिनिशी बोलताना म्हणाले की, या चित्रपटातून असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता आहेत आणि त्यांनी इसीस जॉईन केलं आहे. पण खरा आकडा केवळ तीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
केरळ स्टोरीवरून वाद
केरळ स्टोरी हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शीत झाला आहे. या चित्रपटावरून चांगलाच वाद पेटला आहे. विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. आव्हाडांप्रमाणेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि एमआयएमचे प्रमुख ओवैसी यांनी देखील या चित्रपटावर जोरदार निशाणा साधला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.