मुंबई, 12 मे : ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमानं सध्या बॉक्स चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. अभिनेत्री अदा शर्मा सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमाच्या ट्रेलरमुळे वाद देखील निर्माण झाला होता. मात्र तरी देखील सिनेमा थिएटरमध्ये तग धरून आहे. सिनेमा 100 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान सिनेमाच्या कलाकारांनी सिनेमाचं दणकून प्रमोशन केलं आहे. अभिनेत्री अदा शर्मा देखील अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. अशाच एका मुलाखतीत अदा शर्मानं एक महत्त्वाचा खुलासा केलाय. हा खुलासा तिच्या नावाबद्दल आहे. अदा शर्मा या नावानं ओळखली जाणाऱ्या अदाचं खरं नाव तिनं सांगितलंय. तिचं खरं नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
अदा शर्मा म्हणाली की, “माझं नाव अदा नाहीये. इंडस्ट्रीत आल्यानंतर मी माझं नाव बदललं”. पावनी मल्होत्रा या युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत अदानं हे सांगितलं. ती म्हणाली, “माझं खरं नाव ‘चामंडेश्वरी अय्यर’. हे नाव बोलणं फार कठीण आहे. त्यामुळे मी नाव बदलण्याचा निर्णय घेतला”. गेली अनेक वर्ष अभिनेत्री अदा शर्मा सिनेसृष्टीत काम करतेय. दरम्यान नुकत्याच आलेल्या केरळ स्टोरी सिनेमामुळे ती चर्चेत आली.
हेही वाचा – लग्नाआधीच आई होणार कतरिनाची भावी वहिनी; बेबी बंप फ्लॉन्ट करत म्हणाली…
30 कोटींचं बजेट असलेल्या द केरळ स्टोरी सिनेमानं 90 कोटींचं कलेक्शन केलं आहे. या आठवड्यात शनिवारी सिनेमा 100 कोटींचं कलेक्शन करण्याची अपेक्षा आहे. सिनेमात अदा शर्मानं केलेल्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.
अदा शर्मानं 2008मध्ये 1920 या सिनेमातून करिअरला सुरूवात केली. त्यानंतर ‘हम हैं राही कार के’, ‘हर्ट अटॅक’, ‘हंसी तो फंसी’, ‘कमांडो 2’ सारख्या सिनेमात तिनं काम केलं. आता केरळ स्टोरीनंतर अदा शर्माचं नाव सिनेसृष्टीत मोठं होण्याच्या अपेक्षा आहेत. अदा शर्मा उत्तम अभिनयाप्रमाणेच उत्तम डान्सर आहे. तिच्या डान्समुळेही ती प्रसिद्ध आहे. इतकंच काय तर अदा उत्तम गाते. अनेक मुलाखतीत ती तिच्या गाण्याची झलक चाहत्यांना ऐकवत असते.
अदा शर्माचा जन्म मुंबईतील एका हिंदू कुटुंबात झाला होता. तिचे वडील भारतीय मर्चंट नेव्हीत कॅप्टन होते तर आई एक क्लासिकल डान्सर आहे. अदा शर्मा तब्बल 10 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.