आकाश गौर (मुरैना), 30 एप्रिल : मध्य प्रदेशमध्ये मागच्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारीत वाढ झाल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावर पसरत आहे. याचबरोबर वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान मुरैना जिल्ह्यातील आयुक्त कार्यालयाजवळ चालकाने कार पेटवून दिली आहे. यानंतर तो वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग 44 वरून जाणाऱ्या लोकांनी गाडीला आग लागल्याचे पाहून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आजूबाजूला शोध सुरू केला.
लुधियानात गॅस गळतीने 9 जणांचा मृत्यू, 11 जणांवर उपचार सुरू
ज्या वाहनाला आग लागली तेथून थोड्या अंतरावर एका बाटलीत पेट्रोल आढळून आले, त्यामुळे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीनेच वाहनात पेट्रोल टाकून आग लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला असता कारची डिलिव्हरी ग्वाल्हेरहून करण्यात आली असून गाडीचा मालक दिल्लीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गैरव्यवहार करून ही कार एका तरुणाने घेतली यातून त्याच्यावर दबाव आल्यानंतर त्याने पेट्रोल टाकून वाहन पेटवून दिले आहे. याबाबत पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या सीसीटीव्हीद्वारे तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
भयानक! पाकिस्तानात महिलांच्या मृतदेहावर होतायेत बलात्कार; मुलींच्या कबरीला पालकांनी लावली कुलूपं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर कारला आग लागली. काही क्षणातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. गाडीतील प्रवासी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेले नाहीत यामुळे अद्यापही ही कार पेटवण्याचे कारण समजू शकलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.