रायचंद शिंदे, जुन्नर : तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याच चित्र आहे. पश्चिम आदिवासी भागात असणाऱ्या आपटाळे इथल्या आरोग्य उपकेंद्रात आदिवासी नागरीक उपचारासाठी येतात. यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. उपचारासाठी आल्यानंतर त्या महिलांना जमिनीवरच एका ओळीत झोपवल्याचं समोर आलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आपटाळे आरोग्य उपकेंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा कॅम्प घेतला जातो. या कॅम्पवेळी उपचारासाठी आलेल्या महिलांना जमिनीवर झोपण्यात आलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना आरोग्य उपकेंद्रात गादी टाकून देण्याची आवश्यकता आहे. त्यापण माणूसच आहेत ना? असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जात आहे.
Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 4 वर, 11 जणांना वाचवलं
तुमच्या शहरातून (पुणे)
आपटाळे उपकेंद्रांत या महिलांच्या उपचारावेळी झालेल्या बेजबाबदारपणावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या महिला रुग्णांची काळजी घ्यायला हवी असताना तसं होत नाही. यासंदर्भात या आरोग्य उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर यावेळी जुन्नरच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या महिलांना भूल देण्यासाठी या ठिकाणी झोपवले. मात्र त्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना गादीवर झोपले जाते असे सांगितले.
पश्चिम भागातील गोरगरीब आदिवासी महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. भूल द्या अथवा शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना गादीवर झोपायला हवं याकडे हे प्रशासन लक्ष देईल अशीच अपेक्षा जुन्नर तालुक्यात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.