रुपेशकुमार भगत (गुमला), 15 एप्रिल : झारखंडमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. मागच्या काही काळापासून खून, चोरी, अपहरण या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान झारखंडच्या गुमला येथील गुन्हेगारांनी पोलिसांना आव्हान देत मोठं धाडस केलं आहे.
चैनपूर येथे एका ४४ वर्षीय महिलेचे आणि तिच्या अल्पवयीन मुलीचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी या दोघांना वाचवण्यासाठी पती आल्याने त्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याची हत्या करण्याची भिती दाखवण्यात आली.
हे संपूर्ण प्रकरण चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहादाद गावातील आहे. तक्रारदार लिबीन कुजूर यांची पत्नी फिलसिता कुजूर आणि अल्पवयीन मुलीचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले. लिबिनने याला विरोध केला असता त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याचबरोबर गुन्हेगारांकडे बंदुक असल्याने मला धाकही दाखवण्यात आला. याचबरोबर तक्रार केल्यास तुला ठेवणार नाही असे सांगण्यात आले.
परंतु लिबीन कुजूर यांनी शुक्रवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. लोरंबा गावातील साधन साई याला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. दोन दिवस पत्नी आणि मुलीची वाट पाहत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ती परत न आल्याने आज कशीतरी पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली.
पत्नी बारमध्ये करायची काम, पतीचा संशय ठरला खरा अन्… ठाण्यातील धक्कादायक प्रकार
दुसरीकडे, स्टेशन प्रभारी आशुतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, लिबिन कुजूरची पत्नी आणि अल्पवयीन मुलीचे शस्त्राच्या जोरावर अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या गुन्ह्यात एक नामांकित आरोपी आहे. पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.