हैदराबाद : एका परीक्षेत चांगले मार्क मिळाले नाही म्हणून टोकाचं पाऊल उचलायचं ही गोष्ट चुकीचीच आहे. ती आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही. हे माहिती असूनही भीतीपोटी एकाचवेळी 6 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तेलंगणा स्टेट बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन (TSBIE) ने मंगळवारी 9 मे रोजी निकाल जाहीर केला. त्यानंतर 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी 5 विद्यार्थी हे तेलंगणाचे तर एक निजामाबादचे आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
खोलीत उग्र वास, गडद अंधार अन् वर्षभर तिथेच बंद राहिल्या 2 बहिणी; अवस्था पाहून पोलीसही हादरले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबादमधील वनस्थलीपुरम इथे १७ वर्षीय मुलीने तिच्या घरी आत्महत्या केली. रायदुर्गममध्ये एका 16 वर्षीय मुलीनेही आत्महत्या केली, जी इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी होते. पंजागुट्टा येथे मध्यंतरी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
नेरेडमेट आणि सैफाबाद येथे मंगळवारी (9 मे) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या दोन मुलांनी आत्महत्या केली. त्याचवेळी निजामाबादच्या आरमूरमध्ये परीक्षेत नापास झालेल्या पहिल्या वर्षाच्या इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यानेही आत्महत्या केली.
2 रुपयांचं एक रोप तुम्हाला करेल मालामाल, या सरकारने काढली नवी योजना
एप्रिलमध्ये, तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील सरकारी निवासी शाळेत शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थ्याने एमबीबीएसला अॅडमिशन मिळवण्यासाठी पुरेसे मार्क न मिळणार असल्याच्या भीतीनं आत्महत्या केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी, 11 वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासांच्या आत आंध्र प्रदेशात 9 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.