लखनऊ 21 मे : एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुगार खेळताना पतीने पैसे नाही तर चक्क पत्नीला पणाला लावलं आणि नंतर पैज हरली, असा आरोप करत महिलेनं पोलीस ठाणं गाठलं. त्यानंतर तो माझ्यावर त्याच्या मित्राच्या घरी जाण्यासाठी दबाव टाकू लागला, असं तिने सांगितलं. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हे प्रकरण पूर्व अहमदनगरच्या मेरठ पोलीस ठाण्याच्या लिसाडी गेट भागातील आहे. या परिसरात राहणाऱ्या एका महिलेने लिसाडी पोलीस ठाणं गाठलं . तिने पोलिसांना सांगितलं की, तिचं लग्न 12 वर्षांपूर्वी अहमदनगर येथे झालं होतं. तिचा नवरा मद्यपी आहे. महिलेनं पुढे सांगितलं की, घरी आल्यानंतर पतीने तिला मित्रासोबत जाण्यास सांगितलं. कारण विचारलं असता त्याने मला जुगार खेळताना पणाला लावल्याचं सांगितलं. पण, ती पैज हरली. म्हणूनच तू माझ्या मित्राबरोबर जा, असं तो म्हणाला.
मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; बापाने आरोपीला दिली भयानक शिक्षा, छ. सभांजीनगर हादरलं
महिलेनं पोलिसांना पुढे सांगितलं की, तिच्या पतीचं बोलणं ऐकून तिला धक्का बसला. महिलेच्या म्हणण्यानुसार, ‘पतीने जबरदस्तीने मला त्याच्या मित्रासोबत पाठवायचा प्रयत्न केला. मला काही समजलं नाही म्हणून मी घरातून पळून गेले. मला मदत करा’. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनने तपास सुरू केला आहे. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
पती आपल्याला मारहाण करतो, असंही महिलेचं म्हणणं आहे. तिच्या माहेरची मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्याचा आग्रह धरतो, असं ती म्हणाली. महिला पुढे म्हणाली की, मला माहित नाही की तो मला कोणासोबत पाठवू इच्छित होता. मी त्या व्यक्तीला पहिल्यांदाच पाहिलं. पतीने धमकी दिली की, तुला एकत्र राहायचं असेल तर राहा किंवा कुठेही जा, मला काही फरक पडत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.