धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 1 जून : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असं बिरुद लेवून धारावीची झोपडपट्टी कित्येक वर्षं उभी आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी आहे. 550 एकरांवर पसरलेल्या या वस्तीमध्ये अंदाजे 10 लाख नागरिक राहतात. 100 फुटांच्या झोपडीमध्ये आठ ते दहा लोक दाटीवाटीने राहतात. इथे पायाभूत सुविधांचा वानवा आहे. स्वछता आणि आरोग्य यांची स्थितीही अतिशय हालाकीची आहे. अशा परिस्थितीत धारावीतील एका मजुराच्या मुलीने बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.
स्वतः पण केले काम
तुमच्या शहरातून (मुंबई)
धारावीतील पीएमजीपी कॉलनीत राहणारी शिरीन परवीन शेख हिने बारावीच्या परीक्षेत यश संपादन करत आपल्या आई वडिलांची मान उंचावली आहे. धारावी शिरीनच एक छोटसं कुटुंब आहे. वडील धारावीतील एका बॅग स्क्रीन प्रिंटिंग कारखान्यात मजूर म्हणून काम करतात. अश्या परिस्थिती मधून शिक्षण घेत तिने बारावीचा अभ्यास केला.
घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने शिरीनने एका ठिकाणी कंपाउंडर म्हणून तर दुसऱ्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. त्याच बरोबर एनसीसी, इतर ॲक्टिविट्समध्ये सहभागी होऊन तिने अनेक बक्षिसं देखील जिंकली आहे. 10 बाय 10 च्या खोलीत राहून कामावर जाऊन आई वडिलांना मदत करून शिरीनने बारावीची परीक्षा देऊन 74.17 टक्के मिळविले आहेत.
घरच्यांच्या पाठिंब्यामुळे यश
अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला. पायऱ्यांवर बसून अभ्यास करायचे. अश्यावेळी शेजारी येजा करणारे यांच्या आवाज असायचा. अश्या परिस्थितीमध्ये देखील अभ्यास केला. तसचं पहाटे उठून सुद्धा अभ्यास करायचे यावेळी परिसरात शांतता असायची. कोणत्याही प्रकारची कोचिंग क्लासेस न लावता यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास केला. कारण कोचिंग क्लासेस लावण्यासाठी घरच्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. आज घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मला बारावीमध्ये यश मिळालं आहे, असं शिरीन शेख सांगते.
Jalna News : भले शाब्बास! 12 वर्षानंतर दिली बारावीची परीक्षा, निकाल असा लागला की सगळेच करतायत कौतुक
शिक्षिका बनण्याचे ध्येय
पुढे जाऊन शिरीनला बीएड करून सरकारी शाळेत शिक्षिका बनायच आहे. तिच्या सारख्या मुलांना शिकवायच आहे. मी ज्या शाळेत शिक्षण घेतल आहे त्या शाळेत मला सर्व प्रथम शिकविण्याची इच्छा असल्याचंही शिरीनने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.