प्रतिनिधी, रायचंद शिंदे
पुणे, 08 एप्रिल: पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस चा एक जीवघेणा प्रकार समोर आलाय. कुर्ला नेहरूनगर(मुंबई) ते पिंपळगाव रोठा(नाशिक) या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा संपूर्ण गिअर बॉक्स बस चालू स्थितीत असतानाच अचानक तुटल्यामुळे रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे. ST बस चालू असताना ही घटना घडल्यामुळे सर्वच प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते. मात्र पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व 50 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
लाथाबुक्क्यांच्या मारहाणीविरोधात उगारला चॉपर; जळगावमध्ये दोन गटात हाणामारी; पाच जणं जखमी
तुमच्या शहरातून (पुणे)
आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कुर्ला नेहरूनगर येथून निघालेली व 50 प्रवासी असलेली बस मंचर गावाच्या पुढे आल्यावर एकलहरे पांजरापोळच्या विरुद्ध दिशेला सर्विस रोडला अचानक इंजिनचा गिअर बॉक्स तुकडे झाल्याने बंद पडली. यावेळी बस वेगात होती. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत वेग नियंत्रणात आणला आणि सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.
सदर बसचे इंजिनचे तुकडे आणि त्यामध्ये असलेले काळे ऑइल डांबरी रस्त्याच्या मधोमध पसरलं. यवतरुण काही गाड्या स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र काही सुजाण नागरिकांनी यावर माती टाकून ऑइल पुसून काढलं.
एसटी महामंडळाच्या अनेक बस या कालबाह्य झालेले आहेत व त्यांची अवस्था अत्यंत जीर्ण झालेली आहे. अनेक गाड्यांचे इंजिन हे कामावर आलेले असताना एसटी महामंडळाच्या आगारात सदर बस प्रवासाकरिता निघण्यापूर्वी चेक का केल्या जात नाहीत?तसंच केल्या असतील तर त्यांच्या नादुरुस्त होण्याचे प्रकार का घडत आहेत? असाही प्रश्न या निमित्ताने प्रवासी वर्गामध्ये विचारला जात आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.