लखनऊ, 29 एप्रिल : यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक विक्रम होताना दिसत आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात फलंदाजांची तुफान फटकेबाजी बघायला मिळाली. लखनऊने पंजाब विरुद्ध आयपीएलच्या इतिहासातली दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजीही झाली.
आयपीएलमध्ये आतापर्यंत एका डावात सर्वाधिक धावसंख्या 2013 मध्ये आरसीबी विरुद्ध पुणे वॉरिअर्स यांच्यातील सामन्यात झाली होती. तेव्हा आरसीबीचा सलामीवीर ख्रिस गेलने फक्त 66 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या होत्या. लखनऊ आणि पंजाब यांच्यातील सामन्यातही एका डावात संघाच्या 257 धावांशिवाय इतरही विक्रम झाले आहेत.
एका संघाकडून चौकार षटकार
लखनऊच्या संघाने त्याच्या डावात 41 बाऊंड्री मारल्या. यात 27 चौकार तर 14 षटकारांचा समावेश आहे. आय़पीएलमध्ये कोणत्याही एका डावात दुसऱ्यांदा इतके चौकार षटकार मारले गेले आहेत. याआधी आरसीबी आणि पुणे वॉरिअर्स यांच्यात 2013 मध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी एकूण 42 चौकार, षटकार मारले होते.
बृजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, महिला कुस्तीपट्टूंच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल
सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस
लखनऊ आणि पंजाब यांच्यात आय़पीएल 2023 मध्ये झालेल्या सामन्यात एकूण चौकार षटकारांनी विक्रम केला आहे. दोन्ही संघांनी मिळून 67 बाउंड्री मारल्या. यात 45 चौकार आणि 22 षटकारांचा समावेश आहे. आय़पीएलमध्ये कोणत्याही एका सामन्यातील सर्वाधिक चौकार षटकार 2010 मध्ये लगावले गेले होते. तेव्हा सीएसके आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात फलंदाजांनी 69 षटकार, चौकार मारले होते.
तब्बल 9 जणांची गोलंदाजी
लखनऊ आणि पंजाबच्या सामन्यात सर्वाधिक गोलंदाजांचा वापर केला गेला. लखनऊकडून फक्त कर्णधार केएल राहुल आणि यष्टीरक्षक निकोलस पूरन वगळता 9 जणांनी गोलंदाजी केली. याआधी 2016 मध्ये आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्यात एका संघाने इतक्या गोलंदाजांना गोलंदाजी दिली होती.
IPL 2023 : गावसकरांच्या लाईव्ह कॉमेंट्रीवर भडकला रायुडू, त्या वक्तव्यावर प्रत्युत्तर
एका सामन्यात सर्वाधिक धावा
पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात एकूण 458 धावा झाल्या. लखनऊने 257 धावा आणि पंजाबने 201 धावा केल्या. एका आय़पीएल सामन्यात दोन्ही डावात मिळून झालेली ही तिसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी 2010 ला सीएसके आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात 469 धावा झाल्या होत्या.
200 पेक्षा जास्त धावा
यंदाच्या हंगामात आतापर्यंत 38 सामने झाले आहेत. एका हंगामात सर्वाधिक वेळा 200 पेक्षा जास्त धावा यंदा झाल्या. आतापर्यंत 20 वेळा संघांनी 200 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. 2022 मध्ये 18 वेळा असं झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.