मुंबई, 2 एप्रिल : जगभरातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. आज आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबी मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के देत आहे. याच दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीने टॉस जिंकून गोलंदाजी निवडल्यावर मुंबई कडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन ही जोडी मैदानात उतरली. परंतु आरसीबीने तिसऱ्याच ओव्हरपासून मुंबईला धक्के देण्यास सुरुवात केली. मोहम्मद सिराजने ईशान किशनची विकेट घेतली तर त्यापाठोपाठ, चौथ्या ओव्हरमध्ये कॅमेरून ग्रीन देखील रिस टॉपलीच्या गोलंदाजीचा शिकार ठरला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयन्त केला परंतु आरसीबीच्या गोलंदाजांनी त्याला फार काळ मैदानात तग धरू दिला नाही. रोहित शर्मा सहाव्या ओव्हरमध्ये आकाश दीपने टाकलेल्या चेंडूवर झेल बाद झाला. त्याने 10 चेंडूत केवळ 1 धाव केली. रोहित शर्मा मैदानावर असताना त्याच्या फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही चेंडूवर शॉट मारत असताना रोहितचे वाढलेले पोट कॅमेरात कैद झाले. रोहित त्याच्या वाढलेल्या पोटामुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Rohit Sharma played with a baby and scored blistering 1(10). Salute pic.twitter.com/91IYtIbsAe
— Div (@div_yumm) April 2, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.