मुंबई, 12 एप्रिल : जगप्रसिद्ध आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात झाली असून आज आयपीएलमधील 17 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सचे होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना पारपडणार असून आजचा सामना चेन्नईचा कर्णधार असलेल्या एम एस धोनीसाठी अत्यंत खास ठरणार आहे.
एम एस धोनी हा आयपीएल 2023 मधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असून त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने तब्बल 4 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. 31 मार्च पासून सुरु झालेल्या आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. आज चेन्नईचा संघ चेपॉक स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना खेळणार असून हा सामना धोनीच्या नेतृत्वातील 200 वा सामना असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.