उल्हासनगर, 08 मे : मुंबई जवळील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना नवरदेवाच्या कारने चिडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 12 वऱ्हाडी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 12 वऱ्हाडी जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या सगळ्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बहुतांश महिला आहेत. ज्या कारने वऱ्हाडी मंडळींना चिरडलं ती गाडी ऑटोमॅटिक होती. त्यामुळे कारसमोर नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना अचानक कारने चिरडलं. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.