रितेश कुमार (बिहार), 30 एप्रिल : नवीन लग्न झाल्यानंतर भारतीय परंपरेनुसार मुलगीला पहिले 5 दिवस सासरी घेऊन जाण्याची पद्धत असते. या परंपरेनुसार बिहारमध्ये एका नवदाम्पत्याचे लग्न झाल्यानंतर मुलगीला सासरी घेऊन जात असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न झाल्यानंतर माहेरच्या लोकांचा निरोप घेतल्यानंतर सासरी जाणाऱ्या मुलीने वाटेतच जोरदार राडा घातला आहे. यामुळे या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
नववधूने अचानक वाहन थांबवत रस्त्यावर जोरजोरात ओरडत नाटक सुरू केल्याने सगळ्यानाच धक्का बसला. ही घटना पाहून बरेच जण वाटेत थांबून पाहू लागले. ती नवविवाहित मुलगी ओरडत सर्वांना सांगून लागली माझं अपहरण झालं आहे वाचवा. असे ती वारंवार ओरडत होती.
उधारीवर काकडी मागितल्याने दुकानदार संतापला, दाताने चावला ग्राहकाचा कान आणि….
दरम्यान ती मुलगी घरी निरोप देण्यासाठी फोन मागत होती पण नवविवाहीत मुलाने फोन दिला नाही. यानंतर ती पुन्हा ओरडून सर्वांना सांगू लागली माझे अपहण झाले आहे मला वाचवा. यासगळ्या घटनेनंतर नवविवाहीत मुलगीला पुन्हा तिच्या माहेरच्या घरी सोडण्यात आले. यानंतर नवविवाहित मुलगा तिचे अपहरण करत असल्याचा आरोप मुलीने केला आहे.
यावेळी नवविहाहित मुलगा म्हणाला की, आमच्या वाहनात बसलेल्या एकाला उलट्या होत होत्या म्हणून आम्ही वाहन कडेला घेतले. यादरम्यान मुलगी गाडीतून खाली उतरली आणि आपलं अपहरण होत असल्याचं ओरडायला लागली. यानंतर लोकांची गर्दी जमली. यावेळी ताबडतोब मुलीच्या वडिलांना फोन करून कल्पना देण्यात आली.
भयानक! पाकिस्तानात महिलांच्या मृतदेहावर होतायेत बलात्कार; मुलींच्या कबरीला पालकांनी लावली कुलूपं
यावेळी मुलीचे वडील अशोक पासवान म्हणाले की, असा अपहरणाचा कोणताही प्रकार नाही हे लग्न चांगल्या पद्धतीत झाले असल्याचा खुलासा केला. मात्र मुलीने सासरच्या घरी जाण्यास नकार दिला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला पुन्हा त्यांच्या घरी नेले. परंतु या घटनेनंतर नागरिकांना चर्चेला उधाण आले आहे. रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर मुलीचे वडील अशोक पासवान घटनास्थळी पोहोचले. मुलीच्या अपहरणाची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.