दिल्ली, 07 मे : आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यावेळी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. दोघांनाही या प्रकरणी दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात नवीन उल हकमुळे वाद सुरू झाला होता. तो वाद शेवटी गंभीर आणि कोहली यांच्यात अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद गेला होता. आता पुन्हा एकदा नवीन उल हकने केलेल्या पोस्टची चर्चा सुरू आहे. नवीनने गौतम गंभीरसोबतचा फोटो शेअर करताना कॅप्शनही लिहिला आहे. यावर गौतम गंभीरनेसुद्धा रिएक्शन दिली असून त्याला विराटसोबत जोडलं जात आहे.
नवीन उल हकने सोशल मीडियावर गौतम गंभीरसोबत फोटो शेअर करताना म्हटलं की, “लोकांसोबत तसंच वागा जसं तुम्हाला वाटतं. लोकांशी तसंच बोला जसं तुमच्याशी कुणी बोलावं असं वाटतं.’ पोस्टमध्ये नवीनने गौतम गंभीरला GOAT असंही म्हटलंय. अफगाणिस्तानचा असलेल्या नवीनच्या या पोस्टवर गौतम गंभीरनेसुद्धा रिएक्शन दिलीय. त्याने म्हटलं की, जसा आहेस तसा रहा, कधीच बदलू नको. नवीन आणि गंभीर यांच्यातील ही चर्चा आता चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चेत आलीय. विराटसोबतच्या वादानंतर नवीनवर टीका करणाऱ्यांवर गौतमने निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे.
दिनेश कार्तिकची एक चूक RCBला पडली महागात, दिल्लीने सहज जिंकला सामना
नवीन उल हकने एक मे रोजीसुद्धा सोशल मीडियावरून विराट कोहलीवर निशाणा साधला होता. तेव्हा त्याने म्हटलं होतं की, तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही डिझर्व्ह करता. असंच व्हायला हवं आणि असंच होतंसुद्धा.
विराट आणि नवीन उल हक यांच्या वादात गौतम गंभीरने उडी घेतल्यानं तणाव वाढला होता. दोन दिग्गज खेळाडूंच्या अशा कृत्याने सर्वांनाच धक्का बसला होता. बीसीसीआयने या प्रकरणी तात्काळ कारवाई करत कोहली आणि गंभीर यांना सामन्याच्या 100 टक्के फीचा दंड केला होता. तर नवीन उल हकला 50 टक्के दंड केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.