मुंबई, 20 एप्रिल : खारघर येथे आयोजित ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृतांची संख्या आता 14 झाली आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. हे मृत्यू केवळ उष्माघातामुळे झाले नसून अयोग्य व्यवस्थापनामुळे झाले असल्याचा आरोप विरोधक करत आहे. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर फिरत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी एक फोटो ट्विट करत गंभीर आरोप केला आहे. लोक अन्नपाण्यावाचून मरत असताना सत्ताधारी शाही भोजन घेत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
शाही जेवण..
तुमच्या शहरातून (मुंबई)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री आणि आयोजन जेवण करताना दिसत आहेत. “खारघर येथे निष्पाप लोकांचे तहान-भूकेने जीव जात होते. सत्ताधारी मात्र शामियान्यात “शाही” भोजनावर ताव मारत होते. सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत”, असे कॅप्शन या फोटोला चव्हाण यांनी दिले आहेत.
शाही जेवण
खारघर येथे निष्पाप लोकांचे तहान-भूकेने जीव जात होते.सत्ताधारी मात्र शामियान्यात “शाही” भोजनावर ताव मारत होते.
सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत. pic.twitter.com/xATU7jRR1V
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) April 20, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.