मुंबई, 11 मे : सोशल मीडिया स्टार आणि माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली बालकलाकार मायरा वायकुळ. मालिका संपल्यानंतर मायरानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर मायरा पुन्हा कुठे दिसणार याकडे सर्वांचं होतं. अशातच मायरानं गुड न्यूज देत तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली. वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या मायराचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. चिमुकली मायरा आता हळू हळू मोठी होऊ लागली आहे. मोठी होत असताना तिच्यातील मस्तीखोरपणा देखील वाढत चाललेला पाहायला मिळतोय. एका दमात डॉयलॉग बोलणारी, ऑनस्क्रिन खेळकर मायरा खऱ्या आयुष्यात देखील तितकिच खेळकर आहे. अभिनय आणि डान्स शिवाय मायरा जोक्स सांगण्यात देखील पटाईत आहे. तिनं सांगितलेलं एक जोक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मायरा आता झी मराठीवरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमात दिसणार आहे. बालकलाकारांची कॉमेडी यानिमित्तानं पाहायला मिळणार आहे. दरम्यान एका मुलाखतीत बोलताना मायरानं एक जोक सांगितला तो ऐकून सगळ्यांनी डोक्याला हात मारला. पण तो डायलॉग नेमका काय होता हे पाहूयात. मायरानं राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखीत झुरळाचा एक जोक सांगितला. यात मायराची जोक सांगण्याची पद्धत तिचं लॉजिक ऐकून सर्वांना हसू आलंय.
हेही वाचा – मीनाक्षी-कैलाशनं दणक्यात साजरा केला लेकीचा पहिला बर्थ डे; सेलिब्रेशनसाठी जमले टेलिव्हिजन स्टार्स
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मायरा सांगते, “3 झुरळं भिंतीवर चढत होते. तिघांमधलं एक झुरळ म्हणालं, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे गाणं ऐकून भिंतीवर चढत असलेली तिन्ही झुरळ मरून घाली पडली. असं का ? सांगा पाहू”. मायराचा हा प्रश्न सुरूवातील सगळेच बुचकळ्यात पडलेत. झुरळांचा आणि नाच रे मोरा या गाण्याचा काय संबंध? आणि गाणं ऐकून झुरळ कधी मरू शकतात? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. आता याचं मायरानं याचं दिलेलं उत्तर पाहून तुम्ही देखील डोक्याला हात माराल आणि पोट धरून हसत सुटाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.