भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
कल्याण, 16 मे : सध्या सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. वाढत्या उन्हाळ्यात थंड खावं वाटणं हे सहाजिक आहे. अनेकदा पोटात थंडावा राहावा म्हणून आपण नारळ पाणी पितो. आरोग्यदायी असं हे नारळपाणी कोकोनट क्रीम ज्यूस या नव्या फ्लेवरमध्ये मिळू लागलंय. कल्याणमधील एका ज्यूस सेंटरमध्ये हा प्रकार मिळतोय. हा पदार्थ अगदी कमी कालावधीमध्ये सुपरहिट झालाय.
काय आहे रेसिपी?
तुमच्या शहरातून (ठाणे)
हा हटके पदार्थ बनवण्याची रेसिपी देखील तितकीच खास आहे. गोल नारळ फोडल्यानंतर त्याची पाणी बाजूला केलं जातं. त्यामधील खोबरं तसेच जो फ्लेवर मागितलं असेल त्या फळाचा ताजा गर, बर्फ, फ्रेश क्रीम, दूध, पिठीसाखर, मिल्कमेड, बर्फ हे सर्व जिन्नस टाकून ते मिक्सरमध्ये फिरवले जातात. त्यानंतर नारळातून पाणी आणि खोबरं काढलं जातं. त्यामध्ये ड्रायफूट आणि ज्या फळाचा फ्लेवर सांगितलाय ते काप टाकून ही आकर्षक डिश ग्राहकांना दिली जाते.
कल्याणमधील मकसूद आणि आलिम हे दोन भाऊ हे ज्यूस सेंटर चालवतात. ‘लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहक मुंबईच्या पप्पूभाई यांच्याकडं कोकोनट क्रीम खायला येतात, हे आमच्या लक्षात आलं. त्यांच्याकडं मिळणारी ही डिश नवीन पद्धतीनं देण्याचं आम्ही ठरवलं. त्यानुसार त्यामध्ये आंबा, स्ट्रॉबेरी, फणस, ओरिओ, अंजीर, सीताफळ, खजूर यासारखी ताजी फळं वापरुन आम्ही हा पदार्थ विकण्यास सुरूवात केली. या कोकोनट क्रीमची किंमत 120 रुपये आहे.
आमच्याकडील स्पेशल ड्राय फ्रुट हा पदार्थ चांगलाच लोकप्रिय आहे. 50 ते 100 नारळ दिवसाला संपतात. हे खाण्यासाठी ग्राहक लांबून येतात. सणाच्या दिवशी ही मागणी आणखी वाढते’ अशी माहिती मकसूद यांनी दिली.
गुलाबजामचे इतके प्रकार तुम्ही पाहिले नसतील? एकदा याच या ठिकाणी VIDEO
आम्ही मोजिटोमध्येही अनेक पदार्थ बनवतो. त्याची किंमत 40 रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे त्यालाही चांगली मागणी आहे. फळं विकत घेताना ती चांगल्या गुणवत्तेचीच विकत घेतो, असं मकसूद यांचा भाऊ माजिद यांनी सांगितलं.
कुठं खाणार ?
मकसूद ज्यूस सेंटर, दूध ना पार नाक्याजवळ, कल्याण (पश्चिम)
वेळ : दुपारी 12.30 ते रात्री 11
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.