मुंबई, 4 एप्रिल : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात नारायण राणे यांना न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यानं नारायण राणे यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. हा राणेंसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
17 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकार शद्ब वापरल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी शिवसैनिक सिध्देश पाटेकर यांनी राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सिद्धेश पाटेकर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तुमच्या शहरातून (मुंबई)
कोर्टानं काय म्हटलं?
अखेर या प्रकरणात नारायण राणे यांची अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी निर्देष सुटका केली आहे. या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यानं नारायण राणे यांना दोषमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय कोर्टानं दिला आहे. हा ठाकरे गटासाठी धक्का असून, राणेंना दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.