मुंबई, 05 मार्च : ‘मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभत नाही. तूम्ही ईडी, बिडी वैगरे बोलू नका नाहीतर योग्य जागी पाठवलं जाईल. भाजपच्या नेत्याला अशी भाषा बोलला तर परिणाम वाईट होईल, अशा शब्दात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला,
ठाण्यात रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन जशास तसे उत्तर दिले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
राज्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री ठाण्याला गेले. काल ते डिलिव्हरी करण्यासाठी ठाण्यात गेले होते का? खरंच त्या महिलेला मार लागला होता का ? खरंच ती महिला गरोदर होती का? रिपोर्ट नाही. मात्र असं असताना उद्धव ठाकरेंनी चुकीचं भाषण केलं आहे, असंही राणे म्हणाले.
(हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार फैसला)
‘मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभत नाही. अभिनेता सुशांत सिंग राजपूतला का मारले गेले? दिशा सालियन का मारले गेले? वाझे तुमचे जावई आहेत का? गुन्हेगारी करणारा व्यक्ती मंत्री कसा काय होऊ शकतो. नवाब मलिकांवर गुन्हा दाखल होतो, जेल मध्ये जातात तरीही कारवाई करत नाही, अशी टीकाही राणेंनी केली.
(फडणवीस, ठाकरे अन् शिंदे… कोणत्या सरकारने जाहिरातींवर किती खर्च केले?)
बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र सोडले तर तुमचे काय योगदान आहे ? बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि शरद पवार यांची मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब आयुष्य भर कोणत्याही पदावर बसले नाही उद्धव ठाकरे यांच्या कडून घणाघात होऊ शकतो का? अशी टीकाही राणेंनी केली.
मी सामनाला वृत्तपत्र म्हणणार नाही. मी कधी सामना वाचत नाही मात्र आज मागवून घेतले. असं वृत्तपत्र राज्यात चालू ठेवावं का ? असं वृत्तपत्र चालू चालेल का, काय भाषा यामध्ये आहे, याबद्दल मी कोर्टात जाणार आहे, असंही राणे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.