मुंबई, 10 मे : अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या गुरुवारी सुप्रीम कोर्टामधून निकाल येण्याची शक्यता आहे. शिंदे-फणडवीस सरकारचं भविष्य उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निकाल जवळ आल्याने महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल देसाई देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.
दोन्ही गटांचे शिलेदार दिल्लीला रवाना
गेल्या दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना झाले. खासदार राहुल शेवाळे थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई दिल्लीकडे काही वेळात होणार रवाना होणार आहे. आज रात्री दिल्लीत पोहचणार आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्या लागलणार निकाल?
सत्ता संघर्षातील ज्या प्रलंबित याचिका त्या सगळ्यांचा निकाल एकत्रित लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा हा मूळ प्रश्न त्यात असणार आहे. घटनेच्या दहाव्या परिस्थितीनुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, त्या 16 आमदारांनी त्या उपाध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. उपाध्यक्षांना निर्णय घेता येत नसल्याने सर्वोच न्यायालय काय निर्णय घेत याकडे लक्ष आहे.
वाचा – BREAKING : निकालाची वेळ आली, राज्याच्या सत्तासंघर्षाचा फैसला उद्या येण्याची शक्यता
16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
एकनाथ शिंदे
संदीपान भुमरे
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
संजय शिरसाट
यामिनी जाधव
चिमणराव पाटील
भरत गोगावले
लता सोनावणे
रमेश बोरणारे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
महेश शिंदे
अनिल बाबर
संजय रायमुलकर
बालाजी कल्याणकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.