मुंबई, 11 मार्च : गेल्याअनेक महिन्यांपासून सत्तासंघर्षाच्या निकालावर सुनावणी सुरू होती. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आता प्रतिक्षा संपली आहे. काही वेळातच सत्तासंघर्षाचा निकाल हाती येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही पक्षातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीमधील अनेक आमदार आमच्यासोबत असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. उदय सामंत यांच्या या वक्तव्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान पुढे बोलताना सत्तासंघर्षाचा निकाल आपल्याच बाजूनं लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
प्रवीण दरेकर राज ठाकरेंच्या भेटीला
दरम्यान दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात देखील जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. ही एक औपचारीक भेट असल्याचं समोर येत आहे. मात्र सत्तासंघर्षांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.