मुंबई, 8 मार्च : मोठी बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाविरोधात एक मजबूत आघाडी बनवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. याची जबाबदारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे घेताना दिसून येत आहेत. नितीश कुमार हे येत्या चार दिवसांत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही भेट महत्त्वाची मानली जात असून, या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शरद पवारांचीही घेणार भेट
नितीश कुमार हे येत्या चार दिवसांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. या बैठकीमध्ये ते उद्धव ठाकरे यांना देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी उभारण्यासाठीच्या विशेष बैठकीचे निमंत्रण देणार आहेत. या भेटीनंतर नितिश कुमार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांचा हा महाराष्ट्र दौरा विरोधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण?
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र मिळत असलेल्या माहितीप्रमाणे नितीश कुमार यांंचं नाव चर्चेत आहे. मात्र आपल्याला पंतप्रधान व्हायच नाही, तर मला विरोधकांची मजबूत मोट तयार करायची असल्याचं यापूर्वीच नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.