मुंबई 01 एप्रिल : एक कुख्यात महिला जिचा गोरा रंग, चेहर्यावर निरागस भाव आणि ओठांवर हसू, जे पाहून पोलीससुद्धा फसले. त्या दिवशी पोलिसांची फसवणूक झाली नसती तर 29 जीव वाचले असते. त्या महिलेच्या सौंदर्याच्या मागे तिने तिची काळी कृत्ये झाकली आणि पोलीस तिला पकडू शकले नाहीत. ही कुख्यात महिला ‘व्हाइट विडो’ या नावाने प्रसिद्ध आहे. तिचं खरं नाव समंथा ल्युथवेट होतं. ती ब्रिटनच्या कॉलेजमध्ये शिकली आणि नंतर तिने तिथल्या 26 नागरिकांची हत्या केली. तिने केनियातही 3 जणांची हत्या केली होती. ही समंथा कोण होती आणि ती इतकी भयानक गुन्हेगार कशी बनली हे जाणून घेऊया.
या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय. समंथा ल्युथवेटचा जन्म नॉर्दर्न आयर्लंडमध्ये झाला होता आणि तिचे पालनपोषण इंग्लंडमध्ये झाले होते. ती थोडी समजूतदार झाली आणि तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. 2005 मध्ये इराकमध्ये युद्ध सुरू होते आणि ब्रिटनमध्येही विरोध प्रदर्शनं सुरू होती. इथून समंथाच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट आला.
दारुड्या बापाने शिवीगाळ केली, 22 वर्षीय तरुणीला राग झाला अनावर, घेतला भयानक निर्णय
इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धाविरोधातील विरोध प्रदर्शनांमध्ये समंथा सहभागी होऊ लागली. यादरम्यान तिची भेट जर्मेन लिंडसे या कृष्णवर्णीय मुलाशी झाली. इराकमधील या हल्ल्यांना तोही विरोध करत होता. जर्मेनने इस्लामचा स्वीकार केला होता. समंथाला तो आवडला आणि मग हळूहळू समंथानेही त्याचा धर्म स्वीकारला.
विशेष म्हणजे विरोध प्रदर्शनांमध्ये सहभागी होत असताना समंथाचा ब्रिटन आणि अमेरिकेबद्दल राग वाढू लागला. त्यानंतर तिने सोमालियातील अल शबाब या दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी लंडनमध्ये ट्रेनमध्ये फिदाईन हल्ला झाला होता. यात समंथाच्या पतीचाही मृत्यू झाला. पण नंतर जे सत्य उघड झालं ते धक्कादायक होतं.
लंडनच्या ट्रेनवर झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. नंतर तपासात समोर आलं होतं की बुरखा घातलेली एक महिला याचे नेतृत्व करत होती आणि ती समंथा होती. पण समंथा अतिशय हुशारीने पोलिसांना चकवा देत देश सोडून केनियाला निघून गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, 2012 मध्ये समंथावर केनियातील मोम्बासा इथे हल्लाही झाला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता व अनेक जण जखमी झाले. यानंतर समंथासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. पण ती कधीच पकडली गेली नाही. नंतर समंथाचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध होते, असं समोर आलं. समंथा ‘व्हाईट विडो’ म्हणून प्रसिद्ध झाली आणि नंतर तिच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.