मुंबई, 14 एप्रिल : केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीसह, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. तर दुसरीकडे आपला मात्र राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.
बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता
केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीत देण्यात आलेला बंगला देखील काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयला तशी नोटीस दिली जाऊ शकते. या दोन्ही राजकीय पक्षांना देण्यात आलेले सरकारी बंगले काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.