अनिरुद्ध जहागिरदार
ठाणे, 7 एप्रिल : ठाणे शहर हे खवय्येगिरीसाठी सर्वत्र ओळखले जाते. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ हे ठाण्यातील खवय्यांना आकर्षित करत असतात. ठाण्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ मिळतात. त्या ठिकाणापैकीच एक शहराच्या चरई या भागात मल्हार नॉन व्हेज सेंटर नावाचे नॉन व्हेज पदार्थांचे विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मिळणारे पदार्थ हे कोकणी पद्धतीनं बनवले जातात. त्यामुळे हे केंद्र ठाण्यातील खवय्यांच्या आवडीचे ठिकाण बनले आहे.
कशी झाली सुरुवात?
तुमच्या शहरातून (मुंबई)
श्रीकांत कारलेकर हे इंजिनिअर होते. परंतु कोविड काळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या रोजगार कपातीत त्यांची देखील नोकरी गेली. स्वयंपाक करणे आणि त्यातही नॉनव्हेज बनवायची त्यांना फार पूर्वीपासूनंच आवड होती. त्यामुळे त्यांनी हॉटेलच्या व्यवसायात पदार्पण करण्याचे ठरविले. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात श्रीकांत कारलेकर यांनी हे सेंटर सुरू केले व काही महिन्यांतच त्यांना खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला.
कोणते पदार्थ मिळतात?
या सेंटरमध्ये चिकन, मटण, मासोळी, झिंगे, भेजा मसाला, चिकन मसाला, वजरी मसाला, पाया करी, कलेजी मसाला, अंडा भूर्जी, पॉम्फ्रेट, सुरमई, खिमा, गर्दा अन्य ही पदार्थ येथे मिळतात. या सेंटरमध्ये मिळणारा प्रत्येक पदार्थ हा घरगुती पद्धतीने तयार केला जातो आणि त्याच कारणाने खप जास्त आहे. या सेंटरमध्ये सगळे पदार्थ हे कोकणी पद्धतीनं बनवले जातात. नॉनव्हेज पदार्थांसह सोल कढीसुद्धा प्रामुख्याने विकल्या जाते. 100 रूपयांपासून ते 300 रूपयांपर्यंत नॉनव्हेज पदार्थांची किंमत आहे, असं श्रीकांत कारलेकर यांनी सांगितले.
कुठे आहे सेंटर?
हे सेंटर ठाणे शहरातील शिवकृष्ण विला, चरई या भागात असून सकाळी 11 ते दूपारी 4 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 11:30 पर्यंत सुरू असते. सोमवारी हे सेंटर बंद असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.