मुंबई, 08 मे : अखेरचा चेंडू नो बॉल टाकल्याने राजस्थान रॉयल्सने जिंकलेला सामना गमावला. क्रिकेटच्या जगतात नो बॉल हा गुन्हाच समजला जातो. गोलंदाजाने नो बॉल किंवा वाइड बॉल टाकला तर त्याच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जातात. असेही अनेक क्रिकेटर आहेत ज्यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत एकही नो बॉल टाकला नाही. तर काही गोलंदाज असे आहेत ज्यांनी नो बॉल टाकून नकोसे विक्रम नावावर नोंदवले आहेत. नो बॉल काय असतो आणि किती प्रकारचे आहेत? अंपायर कधी इशारा करतात? याची माहिती आपण घेऊ.
नो बॉल असा चेंडू असतो जो वैध मानला जात नाही. एखाद्या गोलंदाजाचा चेंडू नो बॉल दिल्यास फलंदाजाला एक अतिरिक्त धाव मिळते. ही धाव फलंदाजाच्या खात्यात जात नाही. पण त्यावर धावा काढल्यास फलंदाजांच्या खात्यात त्या जमा होतात. तर गोलंदाजाला आणखी एक चेंडू टाकावा लागतो. नो बॉलवर फलंदाज फक्त धावबाद होऊ शकतो. इतर कोणत्याही प्रकारे तो बाद होऊ शकत नाही.
IPL Play Off : गुजरातची वाट सोपी, आता 3 जागांसाठी 9 संघांमध्ये शर्यत
वन डे आणि टी20 मध्ये गोलंदाजाने नो बॉल फेकल्यास त्याला पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळतो. यात फलंदाज धावबाद, हँडल्ड द बॉल, ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड किंवा हिट द बॉल पद्धतीने बाद होऊ शकतो. आयसीसीच्या नियमानुसार जर नो बॉलवर झेल घेतल्यानंतर फलंदाज धावला तर त्या धावा त्याच्या खात्यात जमा होतात. फलंदाजाने चेंडू मारल्यास त्यावरही धावा काढू शकतो. तसंच बॅटला न लागता स्टम्पला लागून चेंडू बाजूला गेल्यावरही धावा काढता येतात. त्या धावा लेग बाय म्हणून मोजल्या जातात.
गोलंदाजी करताना गोलंदाजाने रेषेच्या पुढे पाय टाकल्यास तो नो बॉल ठरतो. सध्या गोलंदाजाचा चेंडू लाइनवर असल्यास नो बॉल देतात. फुलटॉस चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या वर असेल तर तो नो बॉल ठरतो. पंचांना वाटलं की गोलंदाज थ्रो फेकत आहे तेव्हाही ते नो बॉल देऊ शकतात. चेंडू फलंदाजापर्यंत पोहोचण्याआधी दोन वेळा टप्पा पडला तरी तो नो बॉल असतो. याशिवाय चेंडू फलंदाजापर्यंत पोहोचण्याआधी थांबला तरीही तो नो बॉल दिला जातो. लेग साइडला स्क्वेअरच्या मागे (स्टम्प लाइनच्या मागे) दोन पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक असतील तर नो बॉल देण्यात येतो. गोलंदाजी करताना नॉन स्ट्राइक एंडला स्टम्पला गोलंदाज धडकला तर नो बॉल ठरतो.
नव्वदच्या दशकाआधी नो बॉलवर अतिरिक्त धावा दिल्या जात नव्हत्या. तेव्हा एखाद्या फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारला तर फक्त तेवढ्याच धावा मिळत होत्या. एक अतिरिक्त धाव संघाला मिळत नव्हती. आता फ्री हिटचा नियमही फलंदाजांना फायद्याचा ठरत आहे. हा नियम 2015 मध्ये अस्तित्वात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.