भाग्यश्री प्रधान – आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 30 एप्रिल : प्रवास करताना तुम्ही अनेक वेळा रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या विषयावर सामाजिक संदेश देणारे साईन बोर्ड पाहिले असतील. पण सध्या मुंबईत एका चालत्या फिरत्या वेगवेगळ्या विषयावर सामाजिक संदेश देणाऱ्या साईन बोर्ड वाल्याची चर्चा होत आहे. डोंबिवलीत राहणारा गिरीश वेणूगोपाळ हा साईन बोर्डच्या माध्यमातून मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून सामाजिक संदेश देत आहे. त्याचे हे संदेश लोकांना आवडत असून लोकांची यामधून जनजागृती होत आहे.
कधी पासून करतो काम?
तुमच्या शहरातून (मुंबई)
डोंबिवलीतील ठाकुर्ली येथे राहणारा गिरीश वेणूगोपाळ हा व्यवसायाने हेअर स्टायलिस्ट आहे. गिरीश हा गेल्या 6 वर्षांपासून साईन बोर्डच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम मुंबईत करत आहे. वेगवेगळ्या विषयावर साईन बोर्डच्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन लोकांना जागृत करणे गिरीशला आवडते.
कोणत्या विषयावर देतो संदेश?
मुंबईत राहणारा प्रत्येकजण कधी ना कधी ट्रेन मधून प्रवास करत असतो. ट्रेन मधील गर्दी वाढल्याने डब्यात भांडणाचे प्रसंग ओढवतात. पण आपण सर्वच व्यवहार शांततेत केले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून ट्रेनमध्ये भांडू नका असे संदेश तो प्रवास करताना साईन बोर्डच्या माध्यमातून देत असतो. यासोबतच झाडे लावा, गाडीचा वेग कमी करा, सिग्नलवर हॉर्न वाजू नका असे विविध संदेश तो देतो. गिरीशचे हे साईन बोर्ड संदेश प्रचंड व्हायरल झाल्याचे गिरीश सांगतो.
पर्यावरण वाचवण्यासाठी संदेश
अनेक जण भरधाव वेगाने गाड्या चालवतात. यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी गिरीशने एक साईन बोर्ड तयार केला आहे. या साईन बोर्डवर स्पीड थ्रिल बट कील असे लिहलेले आहे. तर पर्यावरण वाचवण्यासाठी ‘नीड मोर ऑक्सिजन आस्क ए ट्री’ असा संदेश साईन बोर्डवर लिहला असून हा संदेश देण्यासाठी त्याने कायमच केमिकलमुळे दुर्गंधी पसरलेल्या डोंबिवलीतील एमाआयडीसी परिसराची निवड केली आहे. सध्या बांधकामे वाढली असून केमिकलमुळे येणारी दुर्गंधी या परिसरात अधिक जाणवते त्यामुळे हा परिसर निवडल्याचे गिरीशने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.