चिपळूण, 08 मे : महाराष्ट्र केसरी बाला रफिख शेखने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कुस्तीच्या आखाड्यातून माघार घेतली. चालू असलेली कुस्तीची लढत सोडून त्याने मैदान सोडलं. चिपळूणमध्ये कोकण केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. यातील एका लढतीत बाला रफिक शेखने कुस्तीचे मैदानत सोडले. पंचांचा निर्णय न पटल्यानं बाला रफिक शेखने हे पाऊल उचललं.
चिपळूणच्या खेर्डी इथं कोकण केसरी स्पर्धा सुरू आहे. यातील एका लढतीवेळी हा प्रकार घडला. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि उपकेसरी प्रकाश बनकर यांची लढत होती. यात पंचांनी दिलेला एक निर्णय बाला रफिक शेखला पटला नाही. त्यामुळे त्याने थेट लढतीतून माघार घेत मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर बाला रफिक पुन्हा मैदानात आला पण कुस्तीचा निकाल लागला नाही. अखेर सामना बरोबरीत सुटला.
मोचा चक्रीवादळ ‘या’ संघाला आणू शकते अडचणीत, IPLसामन्यावर पावसाचे सावट
२०१८ मध्ये बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव केला होता. बाला रफिक हा मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या खडकी गावचा आहे. बाला रफिक शेखच्या घरी कुस्तीचा वारसा आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून त्याच्या घरी कुस्तीची परंपरा जोपासली आहे.
अकलूजमध्ये ताराराणी महिला केसरी स्पर्धा
अकलूजमध्ये चार दिवस चाललेल्या महिला कुस्त्यांचा थरार अखेर 7 मे रोजी संपला. दिल्ली विरूद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सामना झाला. ताराराणी महिला केसरीतील अंतिम कुस्ती दिव्या कंकरण, उत्तरप्रदेश विरुध्द शिक्षा, दिल्ली यांच्यात संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते लावण्यात आली. अंतिम कुस्तीत 1 मिनिटाच्या आत दिव्याने शिक्षाचा गदालोड डावावर मात करीत ताराराणी केसरीची गदा व 1 लाख रु.पटकाविले. तिला छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.