मुंबई, 14 एप्रिल : रविचंद्रन अश्विन त्याच्या फिरकी गोलंदाजीसह वेगवेगळ्या कारणांनी आतापर्यंत चर्चेत राहिलाय. मंकडिंग पद्धतीने नॉन स्ट्रायकर फलंदाजाला बाद करण्यावरून अनेकदा वादही झाला. अश्विन त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. चेन्नईविरुद्धच्या सामन्यावेळी अश्विनने पंचांच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केला होता. असं करणं अश्विनला भोवलं आहे.
बुधवारी झालेल्या या सामन्यात पंचांनी दव पडत असल्याचं सांगत खेळाडूंना न विचारता चेंडू बदलला होता. सामना झाल्यानंतर अश्विनने पंचांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. बीसीसीआयने अश्विनवर या प्रकरणी कारवाई केलीय.
IPL : रबाडाने फक्त 64 सामन्यात गाठला माइलस्टोन, मोडला मलिंगाचा विक्रम
अश्विन म्हणाला होता की, मला आश्चर्य वाटलं की पंचांना चेंडू बदलला आणि त्यांनी दव पडल्यानं हा निर्णय स्वत:च घेतला. याआधी असं कधी घडल्याचं पाहिलं नाही. पंचांच्या काही निर्णयांनी यंदाच्या हंगामात मला त्रास दिला. खरं तर हे निर्णय चांगले आणि वाईटही आहेत. मात्र आपल्याला समतोल साधावा लागेल. पंचांनी न विचारताच चेंडू बदलला. गोलंदाज म्हणून आम्ही असं सांगितलं नव्हतं, त्यांनी स्वत:च निर्णय घेतला. पंचांना कारण विचारलं तर त्यांनी आम्ही तसं करू शकतो म्हटलं.
अश्विनला त्याचं पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणारं विधान भोवलं आहे. आयपीएलमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केलीय. अश्विनला त्याच्या मॅच फीमधील २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.